
उर्मिला हिने करियरमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सुपरहीट सिनेमे देखील बॉलिवूडला दिले आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.

सध्या सर्वत्र उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

उर्मिला हिच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

उर्मिला तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्रीने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

सोशल मीडियावर देखील उर्मिला कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.