
रणबीर कपूरच नाव बॉलिवूडच्या श्रीमंत कुटुंबांमध्ये येतं. पण आलिया भट्टने आपल्या मेहनतीने स्वत:ची वेगळी ओळख आणि संपत्ती बनवली आहे. तिचं नाव इंडस्ट्रीमधल्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये येतं.

अभिषेक बच्चन एक यशस्वी अभिनेता आहे. पण ऐश्वर्या राय लोकप्रियता आणि नेटवर्थ दोन्ही बाबतीत त्याच्यापेक्षा पुढे आहे. ऐश्वर्या फक्त भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एका नावाजलेली अभिनेत्री आणि ब्राण्ड एंबेसेडर आहे.

विकी कौशलचा भले इंडस्ट्रीच्या टॅलेंटेड अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. पण पत्नी कॅटरीना कैफ समोर त्याचा कमाईचा आकडा खूप छोटा आहे. कॅटरीनाची कमाई आणि ब्रांड वॅल्यू अजूनही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

प्रियंका चोपडाने हॉलीवूड आणि बॉलीवुड दोन्ही ठिकाणी आपली ओळख बनवली आहे. प्रियंका चोपडा तिचा पती निक जोनसपेक्षा पण श्रीमंत आहे. प्रियंका चित्रपटांशिवाय अनेक इंटरनॅशनल ब्रांड्सची एंबेसडर आहे. सोबतच तिचं स्वत:च प्रोडक्शन हाउसही आहे.

रणवीर सिंहची एनर्जी आणि परफॉर्मन्सचे लोक दीवाने आहेत. त्याची पत्नी दीपिका पादुकोण कमाईत रणवीरपेक्षा खूप पुढे आहे. दीपिकाचा समावेश बॉलिवूडच्या टॉप एक्ट्रेसेसमध्ये होतो. अनेक मोठ्या ग्लोबल ब्रांड्सचा ती फेस आहे.