
अभिनेत्री मलायका अरोरा ही 52 वर्षांची आहे. पण दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढतच आहे... मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर मलायकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत मलायका हिने कॅप्शनमध्ये चूपचाप नया साल.. नया बाल... असं लिहिलं आहे. म्हणजे नवीन हेअर स्टाईल केल्यानंतर अभिनेत्री चाहत्यांसोबत नवीन लूक शेअर केला आहे. चाहत्यांना देखील मलायका हिचा लूक प्रचंड आवडलेला आहे.

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.