ब्रश कधी करायचा? योग्य वेळ आणि पद्धत कोणती? 99 टक्के लोक करतात मोठी चूक

दात घासणे केवळ तोंडी स्वच्छतेसाठी नसून गंभीर आजारांपासून बचावासाठी महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासल्याने तोंडातील जिवाणू आणि आम्ल दूर होतात, ज्यामुळे दातांचे किडणे व हिरड्यांचे आजार टाळता येतात.

| Updated on: Oct 15, 2025 | 12:50 PM
1 / 8
तुम्ही रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासता. दात घासणे हे फक्त आपले दात चमकवण्यासाठी किंवा तोंड फ्रेश ठेवण्यासाठी नाही. तर यामुळे आपला मोठ्या आजारांपासून बचाव होतो.

2 / 8
पण दात घासण्याची योग्य वेळ नक्की कोणती, दिवसातून कितीवेळा दात घासावेत, दात घासण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

3 / 8
सकाळी उठल्यावर लगेचच दात घासावेत. कारण रात्री झोपताना तोंडात लाळ कमी बनते. ज्यामुळे तोंडात जिवाणू वाढतात आणि ते आम्ल तयार करतात. जेव्हा तुम्ही सकाळी ब्रश करता तेव्हा हे आम्ल आणि रात्रीचे जमा झालेले जिवाणू बाहेर काढले जातात.

4 / 8
तसेच रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत. रात्री आपण ७-८ तास झोपतो. झोपण्यापूर्वी ब्रश न केल्यास तुम्ही रात्री खाल्लेले अन्नाचे कण तोंडात राहतात. या अन्नाच्या कणांवर जिवाणू वाढतात. लाळ कमी असल्यामुळे हे जिवाणू दातांना किड लावतात आणि हिरड्यांचे आजार वाढवतात.

5 / 8
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगले दात घासल्यास मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. जे लोक दिवसातून तीन किंवा त्याहून अधिक वेळा दात घासतात, त्यांना मधुमेह होण्याचा धोका ८ टक्के कमी असतो. याउलट, ज्यांचे दात किडलेले आहेत किंवा हिरड्यांचे आजार आहेत, त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

6 / 8
प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा आणि प्रत्येक वेळी साधारण २ मिनिटे ब्रश करा. यासाठी फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरा. तसेच ब्रश करण्यासाठी मऊ किंवा मध्यम ब्रिसल्स असलेला ब्रश वापरा.

7 / 8
दात घासणे म्हणजे फक्त ब्रश पुढे-मागे करणे एवढेच नाही, तर त्यासाठी एक योग्य तंत्र आहे. दात घासताना ते कायम वर-खाली अशाप्रकारे घासावे. यामुळे दातांवर तयार होणारा जिवाणूंचा थर (Plaque) निघून जातो, ज्यामुळे दात किडत नाहीत.

8 / 8
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)