BSF Jobs 2025: लगेच करा अर्ज, BSF मध्ये थेट भरती चालू! जाणून घ्या नियम, अटी काय?

BSF Jobs 2025 recruitment: बॉर्डर सिक्योरिटी फोर्सकडून हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

| Updated on: Sep 22, 2025 | 4:26 PM
1 / 6
बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (बीएसएफ) मध्ये नोकरी मिळवून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी भरती सुरू झाली आहे.

2 / 6
पात्र उमेदवार या भरतीसाठी 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बीएसएफच्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन फॉर्म भरावा.

3 / 6
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच किमान 60% गुण असावेत. याशिवाय, उमेदवाराकडे 10वीनंतर संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचे आयटीआय प्रमाणपत्र असल्यासही ते अर्ज करू शकतात.

4 / 6
वयोमर्यादेनुसार उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय सामान्य वर्गासाठी 25 वर्षे, ओबीसीसाठी 28 वर्षे आणि एससी/एसटीसाठी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल. लक्षात ठेवा की वयाची गणना 23 सप्टेंबर 2025 च्या आधारावर केली जाईल.

5 / 6
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांना 100 रुपये + 59 रुपये सीएससी आणि करासह अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

6 / 6
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटवर जा. होमपेजवरील "Current Recruitment Openings" विभागात जाऊन हेड कॉन्स्टेबल भरती लिंकवर क्लिक करा. त्यानंतर मागितलेली माहिती भरून प्रथम नोंदणी करा. नोंदणीनंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व तपशील भरा. आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि निर्धारित अर्ज शुल्क जमा करा. त्यानंतर उमेदवारांनी फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट करा. यानंतर उमेदवारांनी फॉर्मचा प्रिंटआउट काढून ठेवावा.