BSNL Data Plan : फक्त 1 रुपयाचा डेटा प्लॅन, मोफत कॉलिंग, रोज 100 मेसेज, सुविधा वाचून चकित व्हाल!
या ऑफरचा लाभ फक्त नवीन ग्राहकांनाच घेता येणार आहे. किंमत फक्त 1 रुपया असली तरी या प्लॅनची वैधता तब्बल 24 दिवसांची वैधता असते. म्हणजेच एक रुपया खर्च करून जवळपास तीन आठवडे या सुविधांचा वापर करता येतो

BSNL Freedom 2.0 Offer: ग्राहकांना स्वस्त आणि किफायतशीर रिचार्ज प्लॅन देण्यासाठी बीएसएनएलची नेहमीच चर्चा होत असते. कंपनीने नुकताच Freedom 2.0 नावाचा एक अनोखा प्लॅन आणला होता. अवघ्या 1 रुपयात मिळणाऱ्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि अगदी मोफत सिमकार्डचाही फायदा मिळतो. मात्र, ही खास ऑफर आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे या ऑफरचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बीएसएनएलचा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना फक्त 1 रुपया खर्च करावा लागतो. सध्या इतर कोणत्याही मोठ्या टेलिकॉम कंपनीकडून अशा किमतीत एवढा स्वस्त प्लॅन मिळत नाही. बीएसएनएलच्या 4G सेवेचा अनुभव नवीन ग्राहकांना घेता यावा, तसेच आकर्षित करता यावे, या उद्देशाने हा प्लॅन बीएसएनएलने आणला होता. या ऑफरचा लाभ फक्त नवीन ग्राहकांनाच घेता येणार आहे. किंमत फक्त 1 रुपया असली तरी या प्लॅनची वैधता तब्बल 24 दिवसांची वैधता असते. म्हणजेच एक रुपया खर्च करून जवळपास तीन आठवडे या सुविधांचा वापर करता येतो.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. कॉलिंगसोबतच एसएमएसची सुविधाही या प्लॅनमध्ये देण्यात आली आहे. ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मिळतात. 24 दिवसांच्या संपूर्ण वैधतेचा विचार केला तर ग्राहकांना एकूण 2,400 एसएमएस वापरता येतात. डेटाच्या बाबतीतही हा प्लॅन आकर्षक आहे. ग्राहकांना दररोज 1GB हाय-स्पीड 4G डेटा दिला जातो.
म्हणजेच 24 दिवसांच्या वैधतेमध्ये एकूण 24GB डेटा मिळतो. इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन कामांसाठी या डेटाचा वापर करता येईल. या ऑफरचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे प्लॅनसोबत मोफत सिमकार्ड देण्यात येत आहे. नवीन ग्राहकांना बीएसएनएलच्या नेटवर्कशी जोडण्यासाठी कंपनीकडून ही ऑफर दिली जात आहे.
बीएसएनएलने आपल्या अधिकृत X सोशल मीडिया अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष ऑफर 12 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे या ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास ग्राहकांना त्यापूर्वीच प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.