
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली जाणार, असे विचारले जात आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जशी जवळ आहे, तसे पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची चर्चा होत आहे. यंदा केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षाला 6000 रुपये पाठवते. हा निधी प्रत्येक वेळी 2000 रुपये याप्रमाणे एकूण तीन टप्प्यांत दिला जातो. याच आर्थिक मदतीच्या जोरावर शेतकरी आपल्या महत्त्वाच्या गरजा भागवतात.

दरम्यान शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ केली जावी, अशी मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी 6000 रुपयांवरून 9000 रुपये केला जाणार का? असे विचारले जात आहे.

दरम्यान, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या एकूण 21 हप्ते दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांचे 22 व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. यासह यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वाढीव हप्ता मिळणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.