
रविवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण या देशाचं बजेट सादर करतील. या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि सर्वसामान्यांवरील कराचा बोजा कमी होईल असं मानल्या जातं. तर आयकरमध्ये अजून मोठी सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाजारातील तज्ज्ञानुसार, बॅकिंग आणि आर्थिक क्षेत्र यामुळे सध्या तेजीत आहे. बँक ऑफ बडोदा, PNB, SBI, Canara Bank सारख्या PSU बॅकिंग आणि NBFC मध्ये श्रीराम फायनान्ससारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार संधी शोधत आहेत. Axis Bank चा स्टॉक पण कमाल दाखवू शकतो.

कॅपिटल गुड्स आणि इन्फ्रा क्षेत्रात L&T म्हणजे लार्सन अँड टुब्रो सारखी कंपनी गुंतवणूकदारांना खुणावत आहे. ही कंपनी संरक्षण, उत्पादन आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात अग्रेसर दिसत आहे. ही कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीत जवळपास 4500 चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

ऑटो सेक्टरमध्ये आगामी काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात ट्रॅक्टर, युटिलिटी व्हेईकल आणि EV यामध्ये Mahindra & Mahindra ऑटो क्षेत्रातील मोठं नाव आहे. हा शेअर 3900–3950 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर इतर ही कंपन्या अग्रेसर असतील.

कंझ्युमर ओरिएंटेड सेक्टरमध्ये Indian Hotels सारख्या कंपन्या कमाल दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा शेअर जवळपास 875–900 चे उद्दिष्ट गाठू शकतो अशी शक्यता बाजारातील तज्ज्ञाना वाटते. तर इतरही कंपन्या मोठी घोडदौड करण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.