
गोव्यात जाण्याचा अनेक जण दरवर्षी प्लान करतात. फिरण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे. वर्षभर देशी विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मग येथे तुम्हाला फुकटात राहायला आणि जेवायला मिळालं तर...इतकंच काय तुम्ही पैसेही कमवू शकता.

गोव्यात काही रेस्टॉरंट्स अशी आहेत जिथे दिवसभर काम केल्यानंतर राहण्याची आणि जेवणाची सोय फुकटात होते. हा पर्याय सोलो ट्रिपर्ससाठी सर्वोत्तम आहे. या माध्यमातून पैसेही कमवता येतात.

गोव्यात सहलीचा आनंद आणि पैशांची बचत देखील करता येईल. तुम्ही बारटेंडिंग, रिसेप्शनिस्ट, हाऊसकीपिंग किंवा टूर गाइड म्हणून काम करू शकता.

पाली चुलो हॉस्टेल सर्वात चांगला पर्याय आहे. येथे तुम्ही हाउसकीपिंग आणि स्टाफसोबत काम करून पैसे कमवू शकता.

एक दोन दिवस नाही तर 15 दिवस काम करण्याची संधी दिली जाते. त्यात कामाचे तासही कमी असतात. त्यामुळे तुमच्यावर भार पडत नाही आणि पावल्या वेळेत फिरण्याचा आनंद लुटू शकता.