
बुद्धी, वाणी आणि व्यापाराचे स्वामी ग्रह बुध आज, सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३५ वाजता अनुराधा नक्षत्रात गोचर करत आहेत. यापूर्वी ते बृहस्पतीच्या स्वामित्वाखालील विशाखा नक्षत्रात होते, तर अनुराधा नक्षत्रावर शनिचा अधिकार आहे. शनिच्या नक्षत्रात बुधाचा गोचर ही एक महत्त्वपूर्ण ज्योतिषीय घटना आहे. या गोचरामुळे जातकाच्या बुद्धी आणि वर्तनावर शनिची खोली, शिस्त आणि कर्मप्रधानता यांचा प्रभाव पडतो.

द्रिक पंचांगानुसार, बुध ग्रह २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अनुराधा नक्षत्रात राहील. या नक्षत्रातील बुधाच्या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर पडेल, परंतु ३ राशींच्या जातकांसाठी हा काळ सोनेरी ठरू शकतो. या जातकांच्या बुद्धी, वाणी आणि कामकाजात सुधारणा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचं भाग्य उजळेल. चला जाणून घेऊया, या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?

बुध हा स्वतः मिथुन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे अनुराधा नक्षत्रातील हा गोचर या राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन आला आहे. या काळात तुमच्या वाणीत प्रभावशीलता वाढेल आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. व्यापारात नवीन संधी मिळू शकतात आणि रखडलेली कामं गती पकडतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रता वाढवणारा असेल. बुद्धी आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर तुम्ही मोठी यश मिळवू शकता.

कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचा हा गोचर आत्मविश्वास आणि कार्यकुशलता वाढवणारा ठरेल, कारण या राशीचा स्वामीदेखील बुध आहे. तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. कार्यस्थळी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणेचे संकेत आहेत. हा काळ करिअर वाढ आणि बढतीच्या संधींनी भरलेला आहे. कोणताही नवीन करार किंवा प्रकल्प तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडेल.

मीन राशीच्या जातकांसाठी हा गोचर मानसिक स्पष्टता आणि कर्माप्रती जागरूकता आणेल. बर्याच काळापासून अपूर्ण असलेली कामं आता पूर्ण होतील. तुमच्या योजना प्रत्यक्षात येतील आणि परिश्रमाचं योग्य फळ मिळेल. कौटुंबिक जीवनात समन्वय वाढेल आणि संवादात गोडवा येईल. या काळात तुम्हाला एखाद्या वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)