नादच खुळा,सांगलीत उडाला बैलगाडी शर्यतीचा धुरळा, कोणाची बैलजोडी आली पहिली ?

सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्याच्या नांगोळे गावात आज बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीच्या अंतिम स्पर्धेत पिपळगावाच्या बैल जोडीने मैदान मारले. आणि गुलालाचा धुरळाच उडाला. या ऐतिहासिक राज्यस्तरिय "देवाभाऊ केसरी" बैलगाडा शर्यतीचे पहिले मानकरी पिपळगावची सुलतान आणि राम्या ही बैल जोडी ठरली.

| Updated on: Jul 28, 2025 | 6:30 PM
1 / 8
 महाराष्ट्रातील सर्वात जुन्या शर्यतीचे मैदान म्हणून रांगोळ्याच्या बैलगाडी शर्यतीची ओळख आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार पडल्या.

2 / 8
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे आज  देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी या शर्यतीचा फायनल राऊंड पार पडला.

3 / 8
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस आणि नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार पडल्या. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

4 / 8
पहिले बक्षीस 5 लाख 55 हजार 555 रुपये आहे. तर दुसरे बक्षीस 3 लाख 5 हजार 555 आणि तिसरे बक्षीस 2 लाख 5 हजार 555 होते.  या शर्यती पाहण्यासाठी  लाखांहून अधिक लोक जमले होते. भाजपाचे उच्च आणि  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या शर्यतीचे दणक्यात उदघाटन झाले.

5 / 8
आदत, धूसाधूसा आणि जनरल अशा वर्गवारीतील बैलांची शर्यती या ठिकाणी पार पडल्या. बैलाची आरोग्य तपासणी आणि लम्पी रोगाची तपासणी करून बैल शर्यतीमध्ये उतरवण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध बैलगाडी शर्यत नागोळेच्या मैदानावर पार पडली.

6 / 8
पहिला क्रमांक - जनरल गटामध्ये सुलतान आणि राम्या हे महाराष्ट्रचा राज्य देवाभाऊ केसरीचे पहिले मानकरी ठरले, तर दुसरा क्रमांक - हरण्या आणि गज्या या जोडीने  पटकावला आहे. तिसरा क्रमांक - गुलब्या आणि कॅडबरी यांनी पटकावला आहे.

7 / 8
दुपारी बैलगाडी शर्यतीचा अंतिम फेरी उत्साहात आणि दणक्यात  पार पडली. नागोळेच्या या मैदानात पिपळगावच्या रमेश खोत यांच्या सुलतान आणि राम्या या  बैल जोडी शर्यत जिंकल्याने गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला.

8 / 8
 संदीपआबा गिड्डे पाटील यांनी या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. तर ड्रोन फुटेज सौजन्य यशोदा फिल्म्स सांगली यांचे होते.