Snake News : मरून पडलेल्या सापाचे विष असते अतिशय धोकादायक, चुकूनही लावू नका हात नाहीतर…
अनेक डॉक्टर आणि अभ्यासकांच्या मते सापाचे डोके तुटल्यानंतर किंवा तो मेल्यानंतरही तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण सापाच्या विषग्रंथीमध्ये अगोदरपासूनच विष असते.

सापाला पाहून अनेकजण घाबरतात. त्याने दंश केल्यास लगेच मृत्यू होतो, असे अनेकांना वाटते. परंतु काही साप हे विषारी असतात तर काही साप बिनविषारी असतात.
सापाला मारून टाकल्यानंतर तो दंश करू शकतो का? साप मेल्यानंतर त्याच्या विषाचा आपल्यावर परिणाम होतो का? असे काही प्रश्न अनेकदा विचारले जातात. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
अनेक डॉक्टर आणि अभ्यासकांच्या मते सापाचे डोके तुटल्यानंतर किंवा तो मेल्यानंतरही तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण सापाच्या विषग्रंथीमध्ये अगोदरपासूनच विष असते. त्यामुळे एखादा साप निपचित पडलेला आहे, तो मेलेला आहे, असे समजून त्याला लगेच पकडायला जाऊ नये.
मृत्यूनंतरही साप रिफ्लेक्स अॅक्शन देऊ सकतो. विषग्रंथीमध्ये जमा असलेले विष साप बाहेर टाकू शकतो. त्यामुळे असा स्थितीत सापाचे विष तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच साप निपचित पडलेला असला तरी तो तुमच्यासाठी कधीकधी धोकादायक ठरू शकतो.
टीप- वरील लेखातील माहिती ही प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कुठलाही दावा करत नाही. कोणतीही कृती करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.