Gold Ring : 1 ग्रॅम सोनं खूप कामाचं, तयार होईल हा सर्वात आवडीचा दागिना; किती रुपये लागणार?

सध्या सोन्याचा भावात मोठा चढउतार होत आहे. मी एक ग्रॅम सोन्याची अंगठी तयार करू शकतो का, असे नेहमी विचारले जाते. त्यामुळे एक ग्रॅमची अंगठी करण्यासाठी किती रुपये लागतील ते जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 11, 2026 | 3:45 PM
1 / 5
प्रत्येकालाच सोन्याचे दागिने आवडतात. विशेष म्हणजे काही लोकांना मोठा-जाडजुड सोन्याचे दागिना घालायला आवडते. तर काही लोकांना छान डिझाईन असलेला सोन्याचा नाजूक दागिना आवडतो. त्यामुळेच एका ग्रॅमची सोन्याचा अंगठी होऊ शकते का? याचे उत्तर जाणून घेऊ या...

2 / 5
तसं पाहायचं झालं तर एक ग्रॅम सोन्यापासून छान अशी अंगठी तयार केली जाऊ शकते. अशा प्रकारची अंगठी शक्यतो भेट देण्यासाठी, लहान बाळासाठीच केली जाते. फक्त एक ग्रॅमची अंगठी असल्याने ती फार नाजूक असते.

3 / 5
सोबतच एका ग्रॅमच्या अंगठीवर तुम्हाला फारशी डिझाईनही करता येत नाही. कारण 22 कॅरेटचे एक ग्रॅम सोने हे नाजूक असते. त्यापासून तयार केलेली अंगठीदेखील नाजूक असते. ती वाकू शकते. म्हणूनच या अंगठीवर शक्यतो डायमंड लावला जात नाही. सोबतच त्यावर जास्त डिझाईनही करता येत नाही.

4 / 5
आता एक ग्रॅम सोन्याची अंगठी तुम्हाला करायची असेल तर किती रुपये लागतील हे समजून घेऊ. तुम्ही त्या अंगठीवर किती आणि कशा प्रकारची डिझाईन करता यावरून त्या अंगठीसाठी घडणावळीची फी किती असेल हे ठरते. सामान्यत: दागिने तयार करताना घडणावळीवर 3 ते  25 टक्के मेकिंग चार्जेस घेतात. एका अंगठीसाठी साधारण 10 ते 20 टक्के मेकिंग चार्जेस असू शकतात

5 / 5
सोबतच तुम्हाला गोल्ड प्राईस, मेकिंग चार्ज, जीएसटी, हॉलमार्किंग असे वेगवेगळे चार्जेस द्यावे लागतात. सोन्याचा भाव आज 14,500  रुपये असेल तर तुम्हाला 1 ग्रॅमची अंगठी तयार करण्यासाठी 15 टक्के मेकिंग चार्जेस, 3 टक्के जीएसटी म्हणजेच साधारण 500 रुपये, 45 रुपये हॉलमार्क चार्ज, आणि 2,175 रुपये घडणावळीची फी असे एकूण 17,220  रुपये द्यावे लागतील. (टीप- हे फक्त उदाहरण म्हणून देण्यात आले आहे. तुमच्या भागात सोन्याचा भाव वेगळा असू शकतो. सविस्तर माहिती घेऊनच सोन्यात गुंतवणूक करावी. )

Follow Us