
पुणे शहरातून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर शनिवारी अपघात झाला. घाटात कार नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

वरंधघाडातून कार जात असताना चालकास वळणाचा अंदाज आला नाही. यामुळे कार 200 फूट खाली कोसळली. वळणावर संरक्षण कठडे नसल्यानं गाडी थेट नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गेली.

अपघातानंतर स्थानिक रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. कारमधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.

पुणे येथील अक्षय रमेश धाडे (वय 27, रा रावेत), स्वप्निल शिंदे (वय 28, पुणे) आणि हरप्रित (वय 28, पुणे) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) याला वाचवण्यात यश आले आहे.

वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहनधारकांना दिला आहे. परंतु वरंधा घाटातून प्रवास कमी वेळेत होतो त्यामुळे अनेक जण धोकादायक असणाऱ्या या मार्गावरुन जात असतात.