
आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ज्या आजदेखील व्यवहारिक जीवनात फार उपयोगी पडतात. आज चाणक्य नीतिनुसार अशाक लोकांविषयी जाणून घेऊ या, ज्यांची संगत असेल तर आयुष्यात खूप मोठी संकटं येतात.

आचार्य चाणक्य यांनी कोणत्या लोकांपासून दूर राहायचे, याबाबत सांगितलेले आहे. जे लोक योग्य वेळी तुमची साथ देत नाहीत, कठीण काळात तुम्हाला सोडून जातात ते लोक तुमच्यासाठी खूप धोकादायक असतात.

एखादी व्यक्ती तुमचा सतत अपमान करत असेल तर भविष्यात तुमची अडचण वाढू शकते. तुमच्यावर संकट येऊ शकते. तुमचा अपमान करणारी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असते. तसेच तुम्ही अडचणीत सापडल्यास तुम्हाला सोडू जाते. त्यामुळेच तुमचा अपमान करणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी दूर राहावे.

जी व्यक्ती नेमहीच वाईट बोलते, ज्या व्यक्तीच्या मनात नेहमीच घृणा असते तशा माणसांपासून दूर राहावे. जीवनात अशी व्यक्ती सोबत असेल तर तुमच्यावर संकटांचा डोंगर उभा राहू शकतो. म्हणूनच नेहमी दुसऱ्यांचे वाईट व्हावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहायला हवे. कायद्याची भीती नसलेल्या लोकांपासूनही नेहमी दूर राहायला हवे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.