
चाणक्य नुसार, व्यक्तीला पैशाचा मोह नसावा. कारण जे लोक पैसे मिळाल्यावर अहंकारी होतात, त्यांच्याकडे जास्त काळ पैसा राहत नाही. पैसा आल्यानंतर माणसाने नेहमी सर्वांचा आदर केला पाहिजे आणि सर्वांशी नम्र राहावे. आपल्याकडे आलेल्या पैसा आपण इतरांच्या मदतीसाठी वापरला पाहिजे.

चाणक्य नीतीनुसार वाईट काळात पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. हा पैसा धर्मादाय, गुंतवणूक आणि संरक्षणासाठी वापरला जावा. पैसा नुसता जमा करून ठेवू नये. तो विचारपूर्वक आणि योग्य वेळी खर्च केला पाहिजे. तुमच्या कडे भविष्यातील 6 महिने वापरता येईतील एवढे पैसे असावेत.

चाणक्य नीतीनुसार अनेक लोक पैसे मिळाल्यानंतर निष्काळजीपणे पैसे खर्च करतात. विचार न करता अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करतात. असे केल्यास देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे पैशाचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा. यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त सदैव राहतो.

चाणक्य नीतीनुसार पैसा नेहमी प्रामाणिकपणे कमवावा. अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा तुमच्यासोबत जास्त काळ टिकत नाही. पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवला पाहिजे.