
आचार्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, अर्थतज्ज्ञासोबतच ते एक कुशल कुटनितीतज्ज्ञ आणि रणनीतीकार देखील होते. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिला.चाणक्य नीती या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी आयुष्याचं तत्वज्ञान सांगितलं आहे.

चाणक्य नीती हा ग्रंथ आज देखील अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीचं जीवन कसं असावं? याबाबत चाणक्य यांनी मार्गदर्शन केलं आहे.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे की, मेहनती आणि ईमानदार पुरुष महिलांना जास्त आवडतात, अशा पुरुषांकडे महिला लगेचच आकर्षित होता. कारण महिलांना आपल्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा असतो.

महिलांना आपलं आयुष्य एका प्रामाणिक पुरुषासोबत घालवण्याची इच्छा असते. तसेच तो पुरुष जर मेहनती असेल तर त्या महिलेला आपलं भविष्य देखील सुरक्षित वाटतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्य चाणक्य पुढे म्हणतात की महिलांना सरळ स्वभावाचे आणि शांत पुरुष आवडतात, कारण असे पुरुष कोणतंही काम शांत डोक्यानं आणि मोठ्या हिंमतीने करतात.

आर्य चाणक्य म्हणतात की महिलांना शांत, सरळ स्वभावाचे तसेच प्रामाणिक आणि मेहनती पुरुष आवडतात, कारण त्यांची निर्णय घेण्याची क्षमता देखील जबरदस्त असते. ते न डगमगता कोणताही निर्णय घेऊ शकतात.

चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे की, जर महिलेचा जोडीदार हा प्रामाणिक, मेहनती आणि शांत स्वभावाचा असेल तर महिलांना देखील हिंमत येते. मोठा आधार मिळतो. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)