Chanakya Niti: श्रीमंत होण्यापूर्वी मिळतात हे मोठे संकेत, तुम्हालाही असंच जाणवतं का?

Chanakya Niti Good Fortune: आपल्याला अचानक काही गोष्टी जाणवतात. नाहीतर काही भास होतात. नाहीतर काही स्वप्न पडतात. हे काहीतरी संकेत आहेत. श्रीमंत होण्यापूर्वी, संपत्ती येण्यापूर्वी काय मिळतात संकेत? आचार्य चाणक्य काय सांगतात?

| Updated on: Jan 23, 2026 | 4:25 PM
1 / 6
चाणक्यनीतीनुसार, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात भरभराट येणार असेल. मोठी संपत्ती मिळणार असेल अथवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगलं काही होणार असेल. त्याकडे सुख, समृद्धी येणार असेल. पैसा येणार असेल तर त्याला काही संकेत मिळतात. विश्व त्याला अगोदरच त्यांचे संकेत देतो. आर्थिक समृद्धी येण्यापूर्वी काही थेट संकेत मिळतात.

2 / 6
ज्या व्यक्तीच्या आयुष्य समृद्धीकडे वाटचाल करणार असते. त्याच्या मनात सर्वात अगोदर सकारात्मक विचार येतात. त्याला कंटाळवाण्या, काडीबाज आणि नकारात्मक वाढवाणाऱ्या गप्पा, गॉसिप यामध्ये कुठलाही रस वाटत नाही. त्याला कुणाची निंदा नालस्ती करू वाटत नाही. नाहक कुणाला टोमणे मारणे आवडत नाही. तो भविष्याविषयी आशादायक असतो.

3 / 6
संकटातही अशी व्यक्ती विचलित होत नाही. संकटं ही संधी म्हणून आल्याचा विचार त्याच्या मनात येतो. त्याला संकटांची भीती वाटत नाही तर ती एक संधी वाटते. अशी व्यक्ती नकारात्मक चर्चांमध्ये वेळ घालवत नाही. त्याला पुस्तकं वाचण्याचा, चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची ऊर्जा मिळते. तो ऊर्जेने भरून जातो. एक विलक्षण ऊर्जा त्याच्यात खेळते.

4 / 6
वेळ ही संपत्ती आहे असे जेव्हा वाटायला लागते. आता फावल्या वेळेत मी काय करु असा विचार ज्याच्या मनात डोकावत नाही. अथवा जो आळसावत आंथरुणावर अंग झोकून देत नाही. ज्याला प्रत्येक क्षण किंमती वाटायला लागतो. त्याच्याकडे आपोआप यश खेचून येते. तो वेळेचा सदुपयोग करतो. त्याच्याकडे पैसा चालून येतो.

5 / 6
बडेजावपणा करणे आवडत नाही. श्रीमंतींचे प्रदर्शन करणे आवडत नाही. भपकेबाज पणा आवडत नाही. उलट शांत आणि निश्चल वाटत असेल तर लक्षात घ्या तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात. या प्रदर्शनापेक्षा तुम्ही कामावर अधिक लक्ष केंद्रीत करत असाल तर एक दिवस तुमच्यासाठी सर्व सुखाची दारं उघडतील हे निश्चित माना. कामात आनंद मिळत असेल तर हे त्याचेच संकेत आहे.

6 / 6
डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून माहिती घेतली आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हा यामागील उद्देश आहे.