
आपण बऱ्याच वेळा लोकांना बोलताना ऐकले असेल की, काहीही केली तरी कर्म हे मानसाला भोगावेच लागतात. विशेष म्हणजे आचार्य चाणक्य यांचाही यावर विश्वास होता.

आचार्य चाणक्य मानत होते की काही गोष्टी माणसाच्या जन्मापूर्वीच्या कर्मानुसार ठरतात. यापैकी कोणत्याही गोष्टीत बदल होऊ शकत नाही.

पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते.

माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.

तुम्हाला किती ज्ञान आणि किती पैसा मिळेल हे सर्व काही देवाने आधीच ठरवून ठेवले असते. पण देवाने माणसाला कृती करण्याची शक्ती दिली आहे, ज्यामुळे तो आपले नशीब सुधारू शकतो.