
आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र या ग्रंथात मनुष्याला उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्याने समस्यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर उपाय सुचवले आहेत. त्याने जीवनात वागण्याचे नियम व्यवस्थित सूत्रबद्ध केले आहेत. चाणक्याने समाजात वावरताना काही बाबी सांगितल्या आहेत.

"पादाभ्यां न स्पृशेदग्निं गुरूं ब्राह्मणमेव, नैव गां न कुमारी च न वृद्धं न शिशुं तथा" हा त्यांचा श्लोक प्रसिद्ध आहे. यामध्ये चाणक्यांनी कुणाला चुकूनही लाथ लागू नये याची माहिती दिली आहे. समाजात वावरताना काही शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी हा श्लोक महत्त्वाचा मानल्या जातो.

चाणक्य नीतीमधील या श्लोकानुसार, व्यक्तिला अग्नि, गुरू, ब्राह्मण, गाय, कन्या, वृद्ध आणि शिशू , लहान मुलाला कधी लाथ लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना चुकूनही लाथ लागली तर पाप क्षालन करणे आवश्यक आहे. चूक मान्य करणे गरजेचे आहे.

समाजातील वृद्ध, ज्येष्ठ व्यक्ती, गुरू वा ब्राह्मण म्हणजे ज्ञानी व्यक्तीला चुकूनही लाथ लागू देऊ नका. त्यामुळे त्यांचा हा अपमान ठरतो. अशी चूक करणारी व्यक्ती नेहमी दु:खाचा सामना करते. तिला या पापकृत्याचा पश्चाताप झाला नाही तर तिला त्रास होतो.

आई-वडिलांना आपल्या शास्त्रात देवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांनाही लाथ मारू नका. लाथाडू नका. चुकूनही लाथ लागू देऊ नका. कारण शास्त्रानुसार हे पाप मानल्या जाते. ज्यांनी आपल्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. त्यांचा अपमान होईल असे वागू नका असे चाणक्य नीती सांगते

अग्नि देवतेला अनेक धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. सनातन धर्मात अग्नि देवतेला महत्त्व आहे. त्यामुळे अग्निकडे पाय करू नये. तर गाय ही हिंदू धर्मात माता मानली जाते. सनातन धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान आहे. गायीत देवी-देवत असल्याची श्रद्धा आहे. गायीला सुद्धा लाथ मारणे अशुभ मानले जाते.

डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून माहिती घेतली आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हा यामागील उद्देश आहे.