चंद्रकोर टिकलीचा इतका सुंदर अर्थ..; वाचून तुम्हीही भारावून जाल!

चंद्रकोर... म्हणायला केवळ एक सर्वसामान्य टिकली आहे. परंतु याच चंद्रकोराचं महत्त्व असामान्य आहे. कपाळावर चंद्रकोर का लावली जाते किंवा ते कशाचं प्रतिबिंब मानलं जातं, हे तुम्हाला माहीत आहे का?

| Updated on: Jul 18, 2025 | 4:01 PM
1 / 5
चंद्रकोर टिकली ही पूर्वी स्वराज्याचा अभिमान मानली जायची. मराठ्यांकडून लावली जाणारी ही टिकली शक्ती, ओळख  आणि आपलेपणाची प्रतीक होती. चंद्रकोर ही केवळ परंपराच नाही तर त्याहून अधिक त्याचं महत्त्व आहे.

2 / 5
कुंकू किंवा रोलीमध्ये बुडवून तांब्याच्या वस्तूने कपाळावर चंद्रकोर काढली जायची. दोन्ही भुवयांच्या मध्ये ही चंद्रकोर काढली जाते. या विशिष्ट जागी धारणेची ऊर्जा, स्थिर आणि स्पष्ट राहण्याची क्षमता असते.

3 / 5
अर्धचंद्राच्या आकारात शिव तत्व, चंद्राची शांतता आणि काळाची लय धारण केली जाते. हा आकार चतुर्थी तिथी आणि चेतनेच्या चौथ्या अवस्थेला प्रतिबिंबित करतो. ज्याला तुरिया असंही म्हटलं जातं. जी विचारांच्या पलीकडे, झोपेच्या पलीकडे असलेली एक जागा आहे, जिथे फक्त जागरुकता उरते.

4 / 5
चंद्रकोर हे केवळ एक छोटं लाल चिन्हासारखं दिसत असलं तरी त्यात पिढ्यानपिढ्यांची स्मृती, शिस्त आणि पवित्र व्यवस्था आहे. आजही असंख्य महिला कपाळावर चंद्रकोर लावतात. याने स्त्रियांचं सौंदर्य अधिक खुलून येतं.

5 / 5
चंद्राप्रमाणेच चंद्रकोर ही शांतता, शीतलता आणि प्रसन्नता यांचं प्रतीक मानली जाते. भारतीय संस्कृतीतील अनेक संतांनी, राजांनी आणि योद्धांनी कपाळावर चंद्रकोर धारण केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांमध्येही त्यांच्या कपाळावर चंद्रकोर दिसते.