
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही. तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

chanakya

चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज भासते.