शेफ की कुक, हॉटेलमधील किचनचा मास्टरमाईंड कोण? ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही

शेफ हा स्वयंपाकघराचा सूत्रधार असतो, जो मेन्यू, व्यवस्थापन आणि पदार्थांची चव ठरवतो. तर कुक शेफने ठरवलेल्या रेसिपीनुसार प्रत्यक्ष स्वयंपाक करून रोजचे काम सांभाळतो. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील या दोन प्रमुख पदांमधील फरक आणि जबाबदाऱ्या सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Dec 15, 2025 | 11:47 AM
1 / 8
आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, तेव्हा तिथे असलेल्या स्वयंपाकघरात अंत्यत शिस्तबद्धपणे काम चालते. यामागे शेफ आणि कुक या दोन प्रमुख व्यक्तींचे श्रम असतात.

2 / 8
शेफ आणि कुक हे दोघेही स्वयंपाक करत असले तरी त्यांच्या कामाची पातळी आणि जबाबदारी पूर्णपणे वेगळी असते. आज आपण शेफ आणि कुक यांच्यात नेमका फरक काय असतो, याबद्दल जाणून घेऊया.

3 / 8
शेफ हा केवळ स्वयंपाक करणारा नसतो. तो संपूर्ण स्वयंपाकघराचा मुख्य सूत्रधार आणि बॉस असतो. शेफ होण्यासाठी पाककला महाविद्यालयात जाऊन खास शिक्षण त्यासंदर्भातील पदवी घ्यावी लागते.

4 / 8
या शिक्षणावेळी त्यांना फक्त रेसिपीच नव्हे, तर स्वयंपाकघराचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि स्वच्छता व आरोग्य नियम शिकवले जातात. शेफचे मुख्य काम हे विचार करुन योग्य निर्णय घेणे असे असते. एखाद्या हॉटेलच्या मेन्यूमध्ये कोणते पदार्थ असावेत, त्या पदार्थांची चव कशी असावी आणि ते किती रुपये असावे हे सर्व ठरवण्याची जबाबदारी शेफवर असते.

5 / 8
एखाद्या एक्झिक्युटिव्ह शेफ किंवा हेड शेफच्या हाताखाली कुक आणि इतर कर्मचाऱ्यांचे टीम लीडर काम करतात. त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्याकडून काम व्यवस्थित करून घेणे, ही त्यांची जबाबदारी असते.

6 / 8
कुक हा असा कर्मचारी असतो, जो शेफने ठरवलेली रेसिपी प्रत्यक्षात बनवतो. तसेच स्वयंपाकघरातील रोजच्या कामांचा ताण हलका करतो. कुक होण्यासाठी औपचारिक शिक्षणापेक्षा कामाचा अनुभव आणि वारंवार सराव महत्त्वाचा असतो. ते स्वयंपाकघरात काम करत करत शिकतात.

7 / 8
कुकचे मुख्य काम असते कृतीचे तंतोतंत पालन करणे हे असते. शेफने सांगितल्याप्रमाणे भाज्या कापणे, योग्य प्रमाणात मसाले टाकणे, आणि जेवण व्यवस्थित शिजवून ते वेळेत तयार करणे, असे असते.  जर हॉटेलला नवीन बटर चिकन बनवायचे असेल, तर शेफ त्याची खास रेसिपी तयार करतो आणि कुक त्या ठरवून दिलेल्या रेसिपीनुसार, रोजच्या रोज, मोठ्या प्रमाणात, ते बटर चिकन बनवण्याचे काम करतो.

8 / 8
थोडक्यात सांगायचे तर, शेफ हा स्वयंपाकघरातील प्लॅनिंग करणारा व्यक्ती असतो. तर कुक हा तो निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणणारा व्यक्ती असतो. यशस्वी जेवण बनवण्यासाठी या दोघांचीही गरज असते.