
तीन महिन्यापूर्वी आलेल्या माणसाला यांनी उमेदवारी दिली. कुठल्या बेसवर दिली हे सांगावं यांनी. काय कमी आहे आमच्यात, यांनी उत्तर द्यावं आम्हाला.काय चुकलं आमचं? एकनिष्ठ नाही का आम्ही?. छत्रपती संभाजी नगरमधील तिकीट नाकारण्यात आलेल्या भाजप उमेदवारांच्या या भावना आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण बीजेपी खाली येणार आहे. आम्ही बीजेपीला पाडणार आहोत. एकनिष्ठ रहायचं आम्ही. उमेदवारी नाकारली. काय चुकलं आमचं?. भारतीय जनता पार्टीला उतरली कळा आलेली आहे असा संताप छत्रपती संभाजी नगरमधील भाजप कार्यकर्तीने व्यक्त केला.

अतुल सावे साहेबांनी असं का करावं आमच्यासोबत?. मी मंडळाचं पक्षाचं प्रत्येक काम जबाबदारीने पार पडलेलं आहे. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. तीन वर्षापासून जिल्हासरचिटणीस आहे मी, काय चुकलं माझं, यांनी सांगावं. आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली अशा तिकीट नाकारलेल्या भाजप उमेदवाराच्या भावना आहेत.

जनसंघात सुद्धा होते. भाजप स्थापन झाला तेव्हा सुद्धा होते. मधल्याकाळात फक्त शिवसेनेत गेले होते. मला काही नेत्यांकडून सांगितलं गेलेलं की, त्यांना तिकीट देणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग असं का घडलं वेळेवर अशा भावना भाजप महिला नेत्याच्या आहेत.

तुम्ही त्यांच्यात असं काय बघितलं आणि तिकीट दिलं. ताई सगळी घरं फिरलो, एक घर सोडलं नाही. कोलमडून पडलेल्या ताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तिकीट न मिळाल्याचा धक्काच त्यांना सहन होत नाहीय.