साई कॉलेजचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ; परीक्षा शुल्क भरुनही हॉलतिकीट दिलेच नाही, विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

Sai College And Research Institute: छत्रपती संभाजीनगर येथील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून करण्यात आला. तब्बल 200 विद्यार्थ्यांना कॉलेजने परीक्षेचे हॉलतिकीटच दिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Updated on: Dec 04, 2025 | 1:50 PM
1 / 6
छत्रपती संभाजीनगरमधील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचा मोठा प्रताप समोर आला आहे. या कॉलेजने विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी शुल्क वसूल केले. पण आता 200 विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच वाटप केले नसल्याने विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहे. कॉलजने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवल्याचा आरोप करण्यात येत आहे.

2 / 6
या कॉलेजने जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट मिळाले नसल्यानं कॉलेज समोर या विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परीक्षा फी भरूनही परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना-विद्यार्थिंनीना अश्रू अनावर झाले.

3 / 6
हॉलतिकीट न मिळाल्याने काल या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली. या वेळी तुमच्या कॉलेजने परीक्षा शुल्कच भरले नसल्याने हॉलतिकीट मिळाले नसल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कॉलेज असा खेळ का खेळत आहे याचे कारण त्यांना समजले नाही. परीक्षा शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न देणाऱ्या या मुजोरड्या कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

4 / 6
रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचे विद्यापीठाने सांगितले पण मुलांना मिळाले नाही, परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन, मोबाईल बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हॉल तिकीटसाठी कॉलेजच्या गेटवर सर्व विद्यार्थी गोळा झाले आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

5 / 6
साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅनेजमेंट या नावाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत एक कॉलेज आहे. याठिकाणी एम.सी.एस प्रथम वर्गातून २१० विद्यार्थी आज परीक्षा देणार आहेत. पण त्यांना दुसरीच परीक्षा द्यावी लागत आहे. अभ्यासाचा आणि परीक्षेचा ताण असताना हॉल तिकीटासाठी भटकावे लागत आहे.

6 / 6
परीक्षा संदर्भात सर्व अर्ज आणि शुल्क कॉलेजमध्ये जमा केले असून कॉलेज परीक्षेकरीता हॉल तिकीट देत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.याकरिता २१० विद्यार्थी सद्यस्थितीत कालपासून कॉलेजमध्ये ठिय्या देत आहेत.