
सध्या लव्ह इन्सुरन्स नवाचा एक विमा खूपच चर्चेत आला आहे. याच विम्याच्या जोरावर एक महिला फक्त 199 युआन (चीनचे चलन) गुंतवून तब्बल 10 हजार युआनची मालकीण झाली आहे. तिला मिळालेल्या या आर्थिक फायद्यानंतर या इन्सुरन्सची खूपच चर्चा होत आहे.

चीनमध्ये एका कंपनीने 2015-16 सालाच्या दरम्यान लव्ह इन्सुरन्सच्या नावाने एक आगळावेगळा विमा आणला होता. चीनच्या एका महिलेने 2016 हा विमा काढला होता. याच विम्याच्या जोरावर तिला तब्बल 50 पट फायदा झाला आहे. एखाद व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असताना हा विमा काढला जात होता.

तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल त्याच व्यक्तीसोबत तुम्ही भविष्यात लग्न केले तर तुम्हाला या इन्शुरन्स अंतर्गंत 0.5 कॅरेटच्या हिऱ्याची अंगठी, 10 हजार गुलाब किंवा 10 हजार युआन देण्याची हमी या इन्शुरन्समध्ये करण्यात आली होती. याचाच फायदा सध्या चर्चेत आलेल्या महिलेला झाला आहे.

कॉलेजमध्ये असणाऱ्या तरुण-तरुणींना हा विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. कारण कॉलेजमध्ये झालेल्या प्रेमाचे लग्नात रुपांतर होण्याची शक्यता कमी असते. परिणामी इन्शुरन्स कंपनीला फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

परंतु आता चीनच्या सरकारने हा इन्शुरन्स बंद केला आहे. चीनमध्ये हा इन्शुरन्स 2017-2018 हा इन्शुरन्स बंद करण्यात आला. या इन्शुरन्समध्ये रिस्क कव्हर नव्हते. तर जुगाराप्रणामे हा इन्शुरन्स होता. त्यामुळेच यावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते.