
चीनमधील लोक किडे-अळ्या असे विचित्र अन्न खातात असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. या देशात साप, कुत्रे, सरडे आणि मगरी या प्राण्यांचाही समावेश केला जातो. मात्र आता हे लोक झुरळही खात असल्याचे समोर आले आहे. (Photo Source Meta Ai)

चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील लोक आता झुरळ असलेली कॉफी पित असल्याचे समोर आले आहे. बीजिंगमधील एक कीटक संग्रहालय झुरळ असलेली कॉफी विकत आहे. याचे नाव क्रॉली-क्रॉली कॉफी असे आहे. (Photo Source Meta Ai)

या संग्रहालयात मिळणाऱ्या कॉफीवर झुरळाची पावडर आणि वाळलेल्या पिवळ्या किड्यांची पावडर टाकली जाते. या कॉफीच्या एका कपची किंमत सुमारे 560 रुपये आहे.(Photo Source Meta Ai)

चीनमधील लोकांना ही कॉफी खूप आवडत आहे, या कॉफीची चव जळकट आणि थोडीशी आंबट आहे. जूनच्या अखेरीस संग्रहालयाने ही कॉफी लाँच केली आहे जी अल्पावधील लोकप्रिय झाली. (Photo Source Meta Ai)

असा दावा केला जात आहे की, कॉफीमध्ये मिसळलेली झुरळ पावडर रक्ताभिसरणासाठी फायदेशीर आहे आणि वाळलेल्या पिवळ्या किड्याची पावडर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, त्यामुळे ही कॉफी खूप लोकप्रिय आहे. (Photo Source Meta Ai)