AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेनिटरी पॅडची अजब चायनिज जाहिरात तुफान व्हायरल, व्हिडीओ पाहून पोट धरून हसतायत लोक

सोशल मीडियावर अनेकदा जाहिरातींमध्ये उत्पादनाचे फायदे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या जातात. मात्र, काही जाहिरातींमधील कल्पना इतक्या भन्नाट असतात की त्या पाहून लोकांना हसू आवरत नाही. सध्या अशाच एका चायनीज सेनिटरी पॅडच्या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या जाहिरातीतील अतिशयोक्तीपूर्ण दृश्यांमुळे नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सेनिटरी पॅडची अजब चायनिज जाहिरात तुफान व्हायरल,  व्हिडीओ पाहून पोट धरून हसतायत लोक
Chinese Sanitary Pad AdvertisementImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 9:59 AM
Share

सोशल मीडियावर अनेकदा जाहिरातींमध्ये उत्पादनाचे फायदे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या जातात. मात्र, काही जाहिरातींमधील कल्पना इतक्या भन्नाट असतात की त्या पाहून लोकांना हसू आवरत नाही. सध्या अशाच एका चायनीज सेनिटरी पॅडच्या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या जाहिरातीतील अतिशयोक्तीपूर्ण दृश्यांमुळे नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये वाळवंटासारख्या ठिकाणी एक मुलगा आणि मुलगी पाण्याच्या शोधात फिरताना दिसतात. मुलगा बॅगेतील पाण्याची बाटली बाहेर काढतो मात्र त्यात पाणी नसते. दोघेही तहानलेले असताना त्यांना जमिनीवर पाण्याचे एक डबके दिसते. त्यानंतर मुलगा त्या डबक्याजवळ जाऊन पाणी पितो. त्याचवेळी मुलगी आपल्या बॅगेतून पाण्याची बाटली काढण्याचा प्रयत्न करते. मात्र, याच दरम्यान तिच्या बॅगमधून सेनिटरी पॅड खाली पाण्यात पडतो.

जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे, जमिनीवर पडलेला हा पॅड डबक्यातील संपूर्ण पाणी शोषून घेतो. हे दृश्य पाहून मुलगा आणि मुलगी एकमेकांशी वाद घालताना दिसतात. पॅडची शोषून घेण्याची क्षमता दाखवण्यासाठी जाहिरातीत केलेला हा प्रयोग इतका अतिशयोक्तीपूर्ण आहे की, तो पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. उत्पादनाचा गुणधर्म दाखवण्याच्या प्रयत्नात जाहिरातदारांनी कल्पनेची कमाल केल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

पहा व्हिडीओ…

या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. काही नेटकऱ्यांनी जाहिरात बनवणाऱ्यांच्या कल्पनेवर आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी थेट या  जाहिरातीची जोरदार खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने “पिळून घ्या आता तो पॅड” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. तर काहींनी जाहिरातदार काहीही करू शकतात, अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सेनिटरी पॅडची शोषणक्षमता दाखवण्याच्या प्रयत्नात तयार झालेली ही जाहिरात आता मनोरंजनाचा विषय ठरत आहे. मात्र, जाहिरातीतील दृश्य अतिशयोक्तीपूर्ण असून, ते प्रत्यक्ष उत्पादनाच्या क्षमतेचे प्रमाण मानता येणार नाही. भारतातही अशा अनेक जाहीराती बनवल्या जातत, आणि त्या प्रचंड चर्चेतही येतात.

Follow Us
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!