
महिलांना नेहमी प्रश्न पडतो कुठल्या रंगाचे कपडे घालावेत, कोणते कपडे घालावेत. सणासुदीच्या काळात तर हा फार मोठा प्रश्न असतो.या सगळ्यावर आम्ही काही सजेशन्स घेऊन आलेलो आहोत. हे ट्रेंडी रंग तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.

गुलाबी रंग हा खूप महिलांना आवडतो, त्यांच्यावर हा रंग चांगला सुद्धा दिसतो. संजना सांघीने नेसलेली ही साडी बघा किती सुंदर आहे. या साडीचा रंग परफेक्ट पिंक नाहीये, हा रंगी बार्बी पिंक म्हणजेच बार्बी गुलाबी आहे. या रंगाच्या साडीत तुम्ही खूप उठून, सुंदर दिसाल. हा रंग ट्राय करायला हरकत नाही हो ना?

हा रंग आहे बेरी पर्पल आहे. या आऊटफिट मध्ये तुम्ही उठून दिसाल. या रंगात तुम्ही स्कर्ट, टॉप, कुर्ता, साडी असं बरंच काही घालू शकता. हा रंग तुम्हाला ट्रेडिशनल टच देईल.

आलियाच्या नव्या सिनेमा मध्ये आलियाने खूप चांगल्या साडीचे ऑप्शन्स दिले आहेत. यात मल्टिकलर असणारी साडी सुद्धा खूप फेमस झालीये तुम्हाला माहीतच असेल ना? तशीच ही साडी, हिचा रंग फक्त वेगळा. ही साडी रेड-ऑरेंज रंगाची आहे. या शेडमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. सणासुदीसाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे.

सणवार आला की आपल्याला आठवतो पिवळा रंग! तुमच्याकडे पिवळा रंग नसेल तर तुम्ही मोठी चूक करताय. पिवळा रंग सणासुदीला उत्तम चॉईस आहे. हा रंग कधीच ट्रेंड बाहेर नसतो. या रंगाची साडी, ड्रेस घालून बघा तुम्हाला नक्की आवडेल.