
बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री नीरू बाजवा आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

नीरूने तिच्या "मैं सोलाह बरस की" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

बॉलिवूड व्यतिरिक्त, तिने पंजाबी चित्रपटांमध्ये खूप काम केलं आहे.

नीरूनं 2015 मध्ये हॅरी जवंधाशी लग्न केलं. यापूर्वी तिचं नाव प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमित साध यांच्याशी जोडलं गेलं होतं.

वयाच्या 41 व्या वर्षीसुद्धा ती स्वतःला खूप चांगलं सांभाळते. तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

‘नीरू हमें जीत','नच बलिये सीझन 1' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये तिनं धमाकेदार काम केलं आहे.

नीरू विवेक ओबेरॉयसोबत 'प्रिन्स' मध्ये आणि अक्षय कुमारसोबत त्याच्या 'स्पेशल 26' चित्रपटातही दिसली आहे.

नीरू अनेक मोठ्या पंजाबी चित्रपटांमध्ये दिसली आहे, ज्यात "जट्ट अँड ज्युलियट" आणि "जट्ट अँड ज्युलियट 2" यांचा समावेश आहे.

तिचे चाहते नीरू बाजवाची स्टाईल आणि तिच्या अभिनयाचे वेडे आहेत.