
शाहरुख खान कायम त्याच्या तीन मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगताना दिसतो. आर्यन खान आणि सुहाना खान यांच्यानंतर किंग खान - गौरी खान यांनी अबराम याचं जगात स्वागत केलं.

अबराम खान याचा जन्म 27 मे 2013 मध्ये रोगेसीच्या मदतीने झाला. अबराम याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अबराम खान याची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी अबराम याला आयपीएल मॅच दरम्यान वडिलांसोबत पाहण्यात आलं. तेव्हा अबराम याच्या मस्तीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. फार कमी लोकांना माहिती आहे की, अबराम याने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे.

अबराम याने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅपी न्यू ईअर' सिनेमातील 'शराबी' गाण्यात झळकला होता. अबराम खान कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

सोशल मीडियावर देखली अबराम याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शाहरुख खान याचा मुलगा असल्यामुळे अबराम याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.