
अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सध्या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम सुरू आहेत. नुकतच दोघांचं केळवण पार पडलं. आयुषी भावेने त्यांच्या केळवणाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

काही दिवसांपूर्वी सुयश आणि आयुषीचा साखरपुडा झाला होता. सुयशने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

या दोघांचा साखरपुडा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता.

हर्षदा खानविलकर आणि इतर काही कलाकार मंडळीनी मिळून या केळवणाचं आयोजन केलं होतं. यामध्ये अभिजीत केळकर, संग्राम समेळ हे कलाकार देखील उपस्थित होते. या केळवणाच्या कार्यक्रमाला सुयशने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर आयुषी साडी नेसली होती. दोघंही खूप सुंदर दिसत आहेत.

आयुषीने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'नवीन सुरूवात....' असं लिहिलं आहे. सुयश-आयुषीचे फोटो पाहून त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे.