
बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये तिनं पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशमीगाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, चि व चि.सौ.का, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा यासारख्या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनयाने तिने छाप सोडली आहे.

आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्री निमित्त पिवळ्या रंगाची साडी परिधान करत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

प्रसिद्ध फोटोग्राफर स्वप्नील रास्ते यांनी हे फोटो क्लिक केले आहे. आता शर्मिष्ठाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या चाहत्यांच्याही हे फोटो पसंतीस उतरत आहेत.