
बॉलिवूडमधील सर्वाधिक हॉट अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या जान्हवी कपूरला तिच्या मैत्रिणीला तब्बल 5 कोटींची कार गिफ्ट केली आहे.

या कारचे नाव लॅम्बोर्गिनी असे आहे. जांभळ्या रंगाची ही कार असून ती अतिशय आलिशान आणि महागड्या कारमधील एक कार आहे.

तब्बल 5 कोटी रुपयांची कार गिफ्ट करणाऱ्या जान्हवीच्या मैत्रिणीचे नाव अनाया बिर्ला असे आहे.

जान्हवी कपूरकडे इतरही अनेक महागड्या कार आहेत. याच महागड्या कारमध्ये आता लॅम्बोर्गिनी कारचाही समावेश झाला हआहे.

गिफ्ट मिळालेली कार जान्हवी कपूरच्या घरी नेली जात होती. त्यादरम्यान या कारचा व्हिडीओ समोर आला आहे. या कारमध्ये एक गिफ्ट बॉक्स ठेवण्यात आला होता. यात विथ लव्ह...अनाया बिर्ला असे लिहिण्यात आले होते. दरम्यान, जान्हवी कपूर आणि अनाया बिर्ला या दोघीही खूप जुन्या मैत्रिणी आहेत. अनाया बिर्ला ही कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे.