
'बिग बॉस मराठी'च्या या सिझनची सध्या जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमाचा टीआरपी देखील चांगला आहे. या कार्यक्रमात पाहुणे कलाकार देखील येत असतात. आजच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री, खासदार कंगना रनौत आणि अभिनेता श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहेत.

आज रविवार आहे. आजचा 'भाऊचा धक्का'चा खास आहे. कारण कंगना आणि श्रेयस या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. 'इमर्जन्सी' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोघे 'भाऊचा धक्का'वर येणार आहेत.

नमस्कार मंडळी... म्हणत कंगना यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री केली. कंगना आणि श्रेयस यांच्या येण्याने कार्यक्रमात उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनी घरातील सदस्यांशी संवाद साधला.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात कंगना रनौत आणि श्रेयस तळपदे सदस्यांना चांगलच खेळवणार आहेत. आजच्या भागात श्रेयस वर्षा उसगांवकर यांना एक प्रश्न विचारतो. तुमच्यासाठी चित्रपटाचं नाव आहे झपाटलेला... तसं या घरात कोण आहे?, असं श्रेयस म्हणतो.

वर्षा उसगांवकर त्याला उत्तर देतात. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील झपाटलेला व्यक्ती वैभव आहे..., असं त्या म्हणतात. त्यानंतर गॅसच्या फुग्याची हवा इन्हेल करुन घरातील सदस्य एक- एक डायलॉग म्हणतता. आजच्या भागात घरातील सर्वच सदस्यांचा बदललेचा आवाज ऐकताना प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.