
एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. पण आता रवीना टडंन नाही तर तिच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.

राशा थडानी हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही. पण तरी देखील राशाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

राशा थडानी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील राशा हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

राशा हिच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूड अभिनेत्रींचा ग्लॅमर देखील फेल आहे. अभिनेत्री नसली तरी, रवीना हिची लेक म्हणून राशा प्रचंड लोकप्रिय आहे.

अभिनेत्री नसली तरी राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राशा लवकरच करण जोहरच्या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.