
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी ईशा हिने उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केली.

घटस्फोटानंतर ईशा देओल एकटीच आयुष्य जगत आहे. अभिनेत्री कायम मुलींसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्त करत असते. अभिनेत्रीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

काही दिवसांपूर्वी ईशा देओल हिने मुलींसोबत काही फोटो केले होते. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम...' असं लिहिलं होतं.

घटस्फोटानंतर ईशा देओल 'सिंगर मदर' म्हणून मुलींचा सांभाळ करत आहे. दोन मुलींच्या जन्मानंतर ईशा – भरत यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्यामध्ये 1 वर्षाचं अंतर आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.