
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांची ही भेट झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसोबतच रजनीकांत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली.

रजनीकांत आणि नरेंद्र मोदी यांची मैत्री खूप जुनी आहे. काही कारण नसतानाही ते भेटतात. मात्र यावेळी ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली.

रजनीकांत आणि धनुष या दोघांनाही यावेळीच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला आहे.

धनुष हा रजनीकांत यांचा जावई आहे. यावेळी त्यांची मुलगी सौंदर्याही या दोघांसोबत दिसली.

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचीही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी भेट घेतली आणि त्यांना आपले गुरू म्हटले.