
आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, आलिया आणि रणबीर ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी आलियाने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता.

आता आलिया भट्ट तिच्या या लूकमुळे चर्चेत आली आहे. रणबीर कपूर देखील यावेळी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैद्राबादला पोहोचले होते. या कार्यक्रमात नागार्जुन, करण जोहर, जूनियर एनटीआर आणि एसएस राजामौली देखील उपस्थित होते.

यावेळी आलिया भट्टच्या ड्रेसवर 'बेबी ऑन बोर्ड' आणि 'लव्ह-लव्ह' असे लिहिले होते. आलियाची ही खास स्टाईल अनेकांना आवडल्याचे दिसते आहे.

या गुलाबी ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. तिने आपले केस खुले ठेवले होते आणि हलका मेकअप केला होता. रणबीर आणि आलियालासोबत बघण्यासाठी चाहत्यांमध्ये आतुरता बघायला मिळतंय.