
कॉमेडियन कपिल शर्माने बुधवारी 'द कपिल शर्मा शो'च्या पहिल्या पर्वाची झलक सोशल मीडियावर शेअर केली. लवकरच हा शो सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल 12 ची जागा घेणार आहे.

'द कपिल शर्मा शो' 21 ऑगस्टपासून सोनी टीव्हीवर परत येणार आहे.

अजय देवगणच्या चित्रपटाची टीम भुज : द प्राइड ऑफ इंडियाच्या कलाकारांचे कपिलच्या मंचावर आज स्वागत करण्यात आले.

अजय देवगणसोबतच नोरा फतेही, शरद केळकर आणि पंजाबी अभिनेता एमी विर्क हेदेखील कपिलच्या मंचावर दिसणार आहेत.

कपिलच्या सेटवर आणि सेटच्या बाहेर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' च्या कलाकारांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्वतःची आणि पाहुण्यांची दोन छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. कॅप्शनमध्ये कपिलने लिहिले आहे, #Bhuj @ Ajaydevgan @ Noraftehi @ AmyWirk @ Sharadkelkar टीमसोबत दिवस चांगला गेला.