
आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) सध्या नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’ (Mi Honar Superstar) या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी हाती घेत अभिनेत्री संस्कृती बालगुडे. तब्बल 8 वर्षांनंतर संस्कृतीनं टेलिव्हिजनवर धमाकेदार कमबॅक केलं आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपारिक ड्रेसमध्ये दिसतेय.

या फोटोंचा चाहत्यांची पसंती मिळतेय. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘पिंजरा’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या. सांगतो ऐका चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले. अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.