
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण आज मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचं लग्न आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांची चर्चा रंगली आहे. शिवाय त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ दोखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये राधिका प्रचंड सुंदर दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले राधिका यांचे फोटो लग्नापूर्वीच्या विधींदरम्यानचे आहे. सर्वांना राधिका यांचा लूक प्रचंड आवडला आहे.

नव्या नवरीच्या चेहऱ्यावर येणारं तेज राधिका यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आता लग्नात राधिका आणि अनंत कोणता आणि कसा लूक करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.