
36 वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांनी एका हिंदू समारंभात लग्न केलं होतं. या विशेष प्रसंगी अनुपम यांनी गुरुवारी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्न समारंभातील विंटेज फोटो शेअर केली आहेत.

एका फोटोत, दोघांनी गळ्यात हार टाकले आहेत, शिवाय पारंपारिक पोशाखात दोघं दिसत आहेत.

शिवाय अनुपम यांनी त्यांच्या आणि किरण यांच्या 36 वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी एक गोड नोट सुद्धा लिहिली आहे. "36 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय #किरण. हास्य, अश्रू, भांडण, शेअरिंग, मैत्री, प्रेम हे सगळं एकत्र मिळण्याच्या भावनांसह हा एक लांब प्रवास आहे!

अनुपम आणि किरण यांचा मुलगा सिकंदर खेर यांनीही या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. सिकंदर हा किरण यांचा गौतम बेरीबरोबरच्या पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा आहे.

अभिनेत्री-राजकारणी किरण खेर यांना या वर्षाच्या सुरुवातीला कर्करोगाचं निदान झालं होतं. मात्र, त्या आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. किरणनं 14 जून रोजी त्यांच्या आजाराची घोषणा केल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात कॅप्शन लिहिलं होतं, "किरणला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार! ती वैयक्तिकरित्या तुम्हा सर्वांचे आभार मानते. जय हो."