
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली होती. त्यानंतर दुसरा कॅप्टन कोणता सदस्य होणार? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अरबाज पटेलने ही बाजी जिंकली.

'बिग बॉस मराठी'च्या खेळात कॅप्टन पद अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. कारण- कॅप्टन असलेल्या व्यक्तीकडे विशेषाधिकार असतात. त्याला घरातील निर्णय घेण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे ज्या टीममधील सदस्य कॅप्टन होईल, त्या टीमलादेखील त्याचा फायदा होतो.

दुसऱ्या आठवड्यात अरबाजने कॅप्टन पद आपल्या नावावर केलं होतं. पण 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोतून अरबाज कॅप्टन्सी गमावू शकतो, असं दिसतंय.

नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' अरबाजला म्हणतात की, "बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम्स सोईसुविधा विकत घेऊ शकतात. त्याबदल्यात आपले कॅप्टन पद गमवावे लागेल. आता आपल्याला आपला फायदा निवडायचा आहे किंवा घराचा फायदा..."

अरबाज आता घराचा फायदा निवडणार की स्वत:चा हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अरबाज कॅप्टन पद गमावणार असल्याने निक्की मात्र हैराण झाली आहे. अरबाजच्या स्वार्थापायी इतर सदस्यांना मोठा फटका बसणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.