
टेलिव्हिजनचा लोकप्रिय शो 'बेहद' फेम अभिनेत्री जेनिफर विगेंट तिच्या फोटोंमुळे आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिला प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अभिनेत्रीनं नुकतंच तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच जबरदस्त दिसत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

जेनिफरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिनं सन 2013 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सरस्वतीचंद्र' या शोमध्ये कुमुद देसाईच्या भूमिकेत दिसली होती, यासाठी तिला एक पुरस्कार देखील मिळाला होता.

त्याच वेळी 2016 मध्ये तिनं बेहदमध्ये 'माया' ची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. यानंतर ती 'बेपनाह'मध्ये दिसली. 'बेहाद 2' मध्ये सुद्धा ती दिसली होती. तिनं 'कोड एम' वेब सिरीजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवरसुद्धा पदार्पण केलं आहे.

हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.