Lata Langeshakar : बालपणीची हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर, पहा दिदींचे कधीही न पाहिलेले फोटो

| Updated on: Feb 06, 2022 | 3:19 PM

1 / 9
 लता मंगेशकर यांना जी प्रतिष्ठा मिळाली ती त्यांच्या गायकीमुळे... लतादिदींनी चित्रपटांमध्ये सात दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं. त्यांनी हजारो गाणी गायली.

2 / 9
लतादिदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्यप्रदेशामधल्या इंदौरमध्ये झाला. गोव्यातील मंगेशी हे त्यांचं मूळ गाव. लतादिदी सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यात मोठ्या. त्यांना मीना, आशा आणि उषा या लहान बहिणी आणि हृदयनाथ मंगेशकर हे त्यांचे भाऊ.

3 / 9
त्या जन्मल्यानंतर त्यांचं हेमा असं ठेवण्यात आलं. परंतू वयाच्या 5 व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव बदलून लता असं ठेवलं, त्यानंतर त्या लता मंगेशकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

4 / 9
लता मंगेशकर यांनी त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून सुरूवातीच्या काळात संगीताचे धडे घेतले. त्यावेळी त्यांचं वय अवघं ५ वर्षे होतं. लतादिदी केवळ १३ व्या वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. एवढ्या मोठ्या आघातामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब मोडून पडलं. अशा परिस्थितीत लता मंगेशकर यांनी घराची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि आपल्यापेक्षा लहान भावंडांना आईच्या मायेने सांभाळलं.

5 / 9
खरं तर हा तो काळ होता जेव्हा लता मंगेशकर लहान होत्या. त्या रागाच्या भरात त्या कपड्याची बॅग घ्यायच्या आणि घराबाहेर पडायच्या. प्रत्येक वेळी त्यांना घरच्यांनी परत बोलावलं. एकदा वडिल दीनानाथ मंगेशकरांनी त्यांना बजावल्यानंतर त्यांनी पुन्हा असा निर्णय घेतला नाही.

6 / 9
लतादिदींबद्दल त्यांच्या वडीलांनी एक भविष्यवाणी केलेली की, "बाळ लता,  तू भविष्यात इतकं नाव कमावशील की कुणी याची कल्पनाही केली नसेल. पण हे सगळं घडत असतना ते सुवर्णक्षण पहायला मी नसेल. सगळं कुटुंब तू तुझ्या प्रेमाने बांधून ठेवशील."

7 / 9
लहान लतादीदींना त्यावेळी वडिलांचं बोलणं समजलं नाही. पण काही दिवसांनी नेमकं तेच घडलं. दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं आणि संपूर्ण जबाबदारी लता मंगेशकर यांच्या खांद्यावर आली.

8 / 9
लता मंगेशकर यांचं नाव आज माहीत नाही असं क्वचितही कुणी नसेल. लता मंगेशकरांसम त्याच... त्यांच्या नावावर 30 हजारांहून अधिक गाणी आहेत

9 / 9
लतादिदींना 2001 मध्ये लतादिदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आज लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील.