
कॉमेडियन मुनव्वर फारूकी याने बिग बॉस या रिअॅलिटी शोचा 17 वा सिझन जिंकला आहे. बिग बॉसचा सिझन जिंकल्यानंतर मुनव्वरने नव्या प्रोजक्टची घोषणा केली आहे.

बिग बॉसनंतर मुनव्वर फारूकीचं नवं गाणं येत आहे. या गाण्यात मुनव्वरसोबत हिंदी टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा दिसणार आहे.

मुनव्वरच्या या नव्या प्रोजक्टमध्ये हिंदी टीव्ही मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान दिसणार आहे. या दोघांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.

मुनव्वर फारूकी आणि हिना खान यांचं नवं गाणं येत आहे. हलकी हलकी सी... हे नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 20 फेब्रुवारीला या गाण्याचा टिझर रिलीज होणार आहे.

हिना खान ही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षरा हे तिचं पात्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं.