
बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद शो मधून बाहेर पडली आहे, मात्र तरीही ती चर्चेचा भाग असते. आता उर्फी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहे. आता उर्फीनं नवीन लूकमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

उर्फीच्या या लूकचे चाहते वेडे आहेत. यावेळी तिनं प्रिंटेड ट्यूब टॉपसह नारंगी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. सोबतच तिनं सुंदर नेकपीस सुद्धा कॅरी केलं आहे.

या फोटोत ती तिचा टॉप अॅडजस्ट करताना दिसतेय. हे फोटो शेअर करताना उर्फीनं लिहिलं - बहुतेक मुली ट्यूब टॉप घातल्यावर हे करतात…

उर्फीने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यातील एकामध्ये ती तिचा टॉप अॅडजस्ट करताना दिसत आहे.

हजारो चाहत्यांनी उर्फीचे हे फोटो पसंत केले आहेत. सेलेब्ससोबतच चाहतेही तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. ईशा अग्रवालनं कमेंट केली - सुंदर फोटो. त्याचवेळी एका चाहत्यानं लिहिलं - हॉट फोटो.

हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.