
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती तिच्या हॉट लूकने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. आता बिपाशा पती करण सिंह ग्रोव्हरसोबत फिरायला गेली आहे आणि मालदीवमध्ये तिच्या सुट्ट्या अतिशय हॉट स्टाईलमध्ये एन्जॉय करतेय.

आता पुन्हा एकदा बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हरचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बिपाशा बासू आणि करणने या सुट्टीची अनेक फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बिपाशा आणि करण वर्षभरात दुसऱ्यांदा मालदीवची सफर करत आहे. बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केलेत.

या फोटोंमध्ये करण सिंह ग्रोव्हरची स्टाईल बरीच बदललेली दिसतेय. या सुट्टीच्या या फोटोंमध्ये करण वाढलेल्या दाढीमध्ये दिसत आहे. मालदीवमध्ये गेल्यानंतर दोघंही एकत्र एन्जॉय करत आहेत.

बिपाशा बासू आणि करण यांचं 2016 मध्ये लग्न झालं होतं आणि आता त्यांच्या लग्नाला जवळपास 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.