
'रिश्ते', 'कुंडली', 'बालिका वधू', 'साथ फेरे: सलोनी का सफर' अशा मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्य यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. वास्तविक जीवनात, अभिनेत्री केके मेननची पत्नी आहे.

आज निवेदिताच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला केके मेननबरोबर तिच्या प्रेमकथेबद्दल माहिती देत आहोत. एका मुलाखतीत निवेदितानं सांगितलं होतं की आम्ही दोघंही थिएटरमध्ये एकत्र काम करायचो आणि एकत्र काम करत असताना आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आलो.

सुरुवातीचे दिवस खूप कठीण असल्याचं तिनं सांगितलं होतं, कारण आम्ही एकत्र संघर्ष केला, करियर नुकतंच सुरू झालं होतं. अशा परिस्थितीत आम्ही दोघांनी लग्नाचा विचार केला कारण वेगवेगळं भाडं देण्यापेक्षा एकत्र राहणं चांगलं होतं.

निवेदितानं सांगितलं होतं की, आम्ही लग्न लपवून ठेवलं होतं. आम्ही दोघं सुरुवातीपासूनच कमी लोकांसमोर याबद्दल बोलतो केवळ आमच्या खास मित्रांना हे माहित होतं की आम्ही विवाहित आहोत.

आता निवेदिता सोशल मीडियावर आपल्या पतीसोबत सुंदर फोटो शेअर करत असते.

चाहत्यांना निवेदिता आणि केकेला एकत्र पाहणं आवडतं. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

केके मेननने 1995 मध्ये 'नसीम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तर निवेदिताने 1997 मध्ये 'क्या बात है' या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात केली होती.